Ambadas Danve Suspension : विधानपरिषदेत अंबादास दानवे याचे निलंबन मागे होणार का?

Ambadas Danve Suspension : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी सलग दोन वेळा उपसभापती यांच्या दालनात बैठका पार पडल्या. येवढच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली. मात्र आजच्या दिवसात तोडगा काही निघाला नाही. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हा खूप प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने माफीनाम्याशिवाय मार्ग निघणार नाही, अशी भूमिकाच गटनेत्यांच्या बैठकीत घेतली.

अंबादास दानवे यांनी माफीचे पत्र देखील लिहिलं आहे. एवढेच नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयाच्या अनुषंगाने माफी मागितली होती. यातच कारवाई करताना दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला होता. अशा पद्धतीचे निवेदन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये केले.

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलला ऊरळीकर संतापले, पालखीची वाट अडवली

आम्ही सभागृहात सहभागी होतो, मात्र सभागृहाच्या खाली बसून या सगळ्या संदर्भामध्ये सहभागी होऊन, त्यानंतर लगेच विरोधी पक्षातील सर्व आमदार विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सहभागी झाले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्या संदर्भात प्रश्न उत्तरांचा तास झाल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले.

त्यानंतर प्रश्न उत्तरांचा तास संपल्यावर नीलम गोऱ्हे यांच्या दालनात या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री याच्यासोबत बोलून उद्या सभागृहामध्ये घोषण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply