Almatti Dam : 'आलमट्टी'तून सव्वा लाख क्युसेक विसर्ग; पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय, महाराष्ट्राला दिली जातेय वारंवार अपडेट

बेळगाव : पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे कारण देत आलमट्टी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीनपासून धरणातून विसर्ग १ लाख २५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्य पाटबंधारे खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २७) धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. सकाळी सहा वाजता जलाशयातून १ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी बारा वाजता विसर्ग १ लाख ५० हजार क्युसेक झाला. तर, सायंकाळी सहा वाजता विसर्ग तब्बल १ लाख ७५ हजार क्युसेक इतका केला होता; पण गुरुवारी सायंकाळपासून आलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणने आहे. त्यामुळेच धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाटबंधारे खात्याने धरणाची क्षमता १२३.०१ टीएमसी इतकी आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा ८८.५०३ टीएमसी इतका होता. म्हणजे धरण ७१.०९ टक्के इतके भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दीड लाख क्युसेकपर्यंत झाल्यानंतर विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला.

पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी होत होती. धरणातील पाण्याची आवक व विसर्ग यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून वरिष्ठ अधिकारी आलमट्टीत नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून याबाबतची माहिती वारंवार महाराष्ट्र शासनाला दिली जात आहे.

दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे खात्याने गतवर्षीपासून समन्वय ठेवल्याने आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग नियमितपणे केला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणाची पाण्याची पातळीही वाढली आहे. हिडकल धरणाची क्षमता ५१ टीएमसी आहे.

शुक्रवारी (ता. २८) धरणातील एकूण पाणीसाठा ३१.६५८ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २९.६३८ टीएमसी इतका होता. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी २८ जुलै रोजी हिडकल धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८२६ टीएमसी होता तर जिवंत पाणीसाठा ३४.८०६ टीएमसी इतका होता.

Buldhana Bus Accident : बुलढाण्यात दोन खासगी बस एकमेकांना धडकल्या; भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हिडकलमधून विसर्ग नाही’

गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाण्याची आवक मात्र जास्त आहे. गतवर्षी २८ जुलैला धरणातील पाण्याची आवक ४,७१२ क्युसेक्स होती. यंदा मात्र तब्बल २९ हजार ४१५ क्युसेक्स आवक आहे. हिडकल अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे धरणातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply