All Eyes On Rafah : सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 'All Eyes On Rafah' नक्की आहे तरी काय?

All Eyes On Rafah : सोशल मीडियावर नेहमी काही न काही गोष्टी ट्रेडिंगला असतात. सध्या सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह' ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक ऑल आइज ऑन रफाह अशा आशयाच्या स्टोरीज, पोस्ट शेअर करताना दिसत आहे. परंतु हे ऑल आइज ऑन रफाह काय आहे? तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.

रफाह हे गाझापट्टीतील  एक शहर आहे. गाझापट्टीतील रफाह या शहरावर इस्त्रायलकडून वारंवार हल्ले होत आहे. रफाह या शहरात लाखो पॅलिस्टिनी लोक राहत आहे. रविवारी इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात जवळपास ४५ लोकांना मृत्यू झाला आहे. त्यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात सर्वाधित महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, असं सांगण्यात येत आहे.

Monsoon Hits Kerala : पाऊस आला रे! २ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

रफाह शहरातील परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे या शहरावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह' हा ट्रेंड सुरु केला आहे. युएनच्या अधिकाऱ्यांनी इस्त्रायलला रफाह शहरावरील हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

गाझामध्ये इस्त्रायली सैनिक जमिनीवर हल्ले करत आहे. त्यामुळे हजारो लोक मारले गेले आहेत. इस्त्रायल आणि हमासमधील युद्धाचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि त्यामुळे रफाह शहरावर होणारे हल्ले रोखण्यासाठी हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.

All Eyes On Rafah या ट्रेंडला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आलिया भट्ट, सोनम कपूर, माधुरी दिक्षित, अनुराग कश्यप, झोया अख्तर अशा अनेक कलाकारांना सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply