Alibaug : अलिबागजवळ बोटीला भीषण आग, १८-२० प्रवासी अडकल्याची भीती

Alibaug Boat Fire News : मुंबईजवळच्या अलिबागमध्ये समुद्रातील एका बोटीला भीषण आग लागल्याचं समोर आले आहे. या बोटीमध्ये १८-२० प्रवासी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिमार बोटीला १० वाजेदरम्यान भीषण आग लागली आहे. आगीचे नेमंक कारण काय? याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही.

१८ जणांना वाचवण्यात यश

अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला. आज सकाळी ही घटना घडली. आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली. बोटीच्या वरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची बोट आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आग विझविण्याचे काम सुरू आहे.

Pune News : धक्कादायक! कल्याणीनगर पुलावरून उडी मारून तरुणाने आयुष्य संपवलं, कारण अस्पष्ट

याआधीही एका बोटीला लागली होती आग

अलिबागच्या मांडवा बंदरात एका खाजगी स्पीड बोटीला २ डिसेंबर २०२३ रोजी आग लागली होती. या अपघातात दोन जण जखमी झाले होते. मुंबई गेटवे येथून मांडवा बंदरात दाखल झालेल्या बोटीला आग लागली होती. त्यावेळी बोटीमधील जनरेटरमुळे आग लागल्याचे समोर आले होते. बोट जेट्टीपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर उभी करण्यात आली होती.

या अपघातात बोटीचे लाखोंचे नुकसान झाले होते. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण दोन जण किरकोळ जखमी झाले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply