Illegal hoarding : आळंदी, देहूफाटा चौक बेकायदा फलकांचे आगर

आळंदी : आळंदी (ता. खेड) विद्युत पोलवर तसेच चौकाचौकातील सार्वजनिक मालमत्तेवर बेकायदा जाहिरात फलक झळकत आहेत. परवानगी न घेताच संबंधितांनी शहरभर फलक लावून विद्रूपीकरण केले आहे. बेकायदा होर्डिंगचे देहूफाटा चौक माहेरघरच बनले आहे. किवळे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. शहराच्या विद्रूपीकरणाकडे प्रशासनाचा काणाडोळा होत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आळंदीत जाहिरात फलक लावणे म्हणजे स्वतःची फुकटात जाहिरात करून घेण्याचा प्रकार आहे. राजकीय मंडळी, क्लासेसवाले, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, औषधांच्या जाहिराती, दुकानांच्या उद्घाटनाच्या जाहिराती आणि गुडांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीही झळकत असतात. सध्या पाच वर्षात प्रशासनाची आणि राजकीय मंडळींची पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील पकड ढिली पडली.

परिणामी शहरात होर्डिंग आणि अनधिकृत फलकांच्या जाहिरातबाजीचे पेव फुटले आहे. कुणाच्याही जाहिराती फ्लेक्स परवानगी नसताना लागतात. पुणे आळंदी रस्ता ते चाकण रस्त्यापर्यंत प्रत्येक पथदिव्यांवर जाहिरातींचे फलक आहेत.

माउली मंदिर महाद्वारावरच फलक

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराभोवतीही मोठाले फ्लेक्स मंदिराचे महाद्वार दिसणार नाही अशा स्वरूपात झळकतात. पोलिस आणि पालिका प्रशासन दोघेही याकडे डोळेझाक करत आहे. फुकट्यांच्या जाहिरातीकडे काणाडोळा केल्याने मंदिरात प्रवेश नेमका कुठून विचारत विचारत भाविक येतात. माऊलींच्या मंदिर आणि महाद्वारही अनधिकृत जाहिरात बाजीवाल्यांनी सोडले नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply