Akola Rain : अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस; अनेकांचे संसार उघड्यावर, केळी पिकाचे मोठे नुकसान

Akola Rain :  अकोल्यात मध्यरात्रीच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पाऊस देखील झाला. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. तर काही घरांमध्ये पत्रे उडून गेले. यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. तर तेल्हारा तालुक्यातल्या केळी पिकांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले. 
 
अकोल्यात  मंगळवारी दुपारी उन्हाचा पारा वाढलेला होता. उन्हाचे चटके असह्य होते. दरम्यान सायंकाळी पावणेपाच वाजेपासून अकोला शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांना काहीसा उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. दरम्यान आज अकोला जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण कायम आहे. तर जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यात काल रात्री जोराचा वारा वाहत होता. याशिवाय अनेक भागात पाऊस देखील झाला आहे. तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या.
 
झाड पडल्याने घरांचे नुकसान 
तेल्हारा तालुक्यातील दानापुर भागात जोराच्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. एका शेतकऱ्यांच्या घरावरील टिनपत्रे वाऱ्यामुळे उडाली असल्याने नुकसान झाले आहे. तर काहींच्या घरावर झाड उन्मळून पडले आहेत. यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहे. 
 
 

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply