Akola News : पोलिस अधिकारीच लाचेची रक्कम घेऊन पळाला, अकोल्यातील धक्कादायक घटना

Akola News : एसीबीच्या कारवाईचा संशय होताच एक पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झालाय. हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतीत घडलं आहे. एका प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन आणि त्यांच्या बाजूने चार्जशीट तयार करण्यासाठी अकोट शहर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यानं तब्बल दीड लाखाची लाच मागितल्याचं हे प्रकरण आहे.

तडजोड करून लाचेची रक्कम 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत पोहचली. दरम्यान, राहुल देवकर असे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी माहिती दिली. 

Maharashtra Politics : मला मोदीजींनी सांगितलं लोकसभा नाही, तर बूथ जिंकायचा आहे; देवेंद्र फडणवीस

दरम्यान, अवैध सावकार प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीला तात्काळ अटकपूर्व जामीन आणि आरोपींच्या बाजूनं चार्जशीट तयार करून तपास सोपा जावा यासाठी एपीआय राहुल देवकर यांनी तब्बल तक्रारदाराला दीड लाखाची मागणी केली होती. तडजोड करून लाचेची रक्कम ही 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत आली. दरम्यान लाच देणं तक्रारदाराला मान्य नसल्यानं त्यांनी अमरावतीच्या एसीबी कार्यालयात धाव घेतली, आणि आपली तक्रार नोंदवली. 

या प्रकरणात सर्व पडताळणी करून लाचखोर एपीआय राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याच सिद्ध झालंय. त्यानुसार आज लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राहुल देवकर हे अकोट शहरात दाखल झाले आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारली खरी. परंतु देवकर यांना एसीबीच्या कारवाईचा संशय झाला, त्यानंतर लागलीच त्यांनी लाचेची रक्कम घेत आपल्या खाजगी चारचाकी वाहनानं पळ काढला.

दरम्यान एसीपीच्या अधिकाऱ्यांनी राहुल देवकर यांचा दूरपर्यंत पाठलाग केला परंतु ते हाती लागले नाहीत. आता या प्रकरणात अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी सामशी बोलतांना दिली. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाडी आहे. सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकारी एपीआय राहुल देवकर यांच्या शोधात असून ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply