Akola : अकोल्यात दोन बांगलादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या? एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Akola : अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका परिसरात दोन बांगलादेशी इसम अनधिकृतरित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळताच एटीएस आणि एमआयडीसी यांनी संयुक्त कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती प्राप्त असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

राज्यात बांगलादेशी इसम मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या वास्तव्य करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे ड्राईव्ह राबविण्याचे निर्देश नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सदर निर्देशानुसार राज्यातील गुप्त यंत्रणा, जिल्हा एटीएस कामाला लागले असून त्यांनी कुंडली गोळा करण्यास सुरुवात केली.

Navi Mumbai Airport : नव्या वर्षाचं गिफ्ट, रविवारी पहिली लँडिंग होणार, नवी मुंबई विमानतळ ठरलेल्या वेळेतच सुरू होणार

या मोहिमेत जिल्हा एटीएसला मोठे यश मिळाले असून शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात दोन बांगलादेशी इसम राहत असल्याची खात्री होताच जिल्हा एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत दोन बांगलादेशी इसमांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी संपूर्ण पडताळणी केल्याअंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मनी शंकर निशिकांत बिश्वास (वय 27 वर्ष) आणि निर्मल उर्फ नयन निशिकांत बिश्वास (वय 25 वर्ष) या दोघांची नावे आहे. शंकर हा अकोला एमआयडीसीत एन पाटकर कन्स्ट्रक्शन कंपनीत मजुरी करीत होता. आणि तो गोहा काचर ता. गफिनायपुर जि. गोपालगंज बांगलादेश येथील आहे. तर नयन हा पवार अँड पाटकर कंट्रक्शन कंपनीत मजुरी करायचा, तो मूळ गोहाकाचर ता. गपिनायपूर जिल्हा - गोपालगंज बांगलादेश येथील आहे. त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, कोविड कार्डसह अन्य साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैशालीमुळे यांनी केली.

सदर प्रकरणी केलेल्या कारवाईची मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली असून सदर कारवाई बाबत कोणीही काही बोलण्यास तयार नाही. तर शहरात अजून काही ठिकाणी अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी इसम यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply