Akola News : अकोल्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न

Akola News : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत असताना लष्करातील दोन जवानांना वीरमरण झालं. यामध्ये अकोला जिल्ह्यातील एका जवानाचा समावेश आहे. प्रवीण प्रभाकर जंजाळ (वय २४) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे.

प्रवीण हे मोरगाव भाकरे गावातील रहिवासी होते. २०२० मध्ये ते सेंकड महार बटालियनमध्ये भरती झाले होते. तेव्हापासून त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. मात्र, ४ महिन्यांपूर्वी प्रवीण यांना सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत जम्मू-काश्मीर येथे पाठवण्यात आले होते.

Pune PMP Bus : आनंदाची बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार आरामदायी, आता घरबसल्या काढता येणार पीएमपी बसचे तिकीट

दुर्दैवी बाब म्हणजे, प्रवीण यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं होतं. दरम्यान, दहशतवाद्यांशी लढताना प्रवीण यांचं वीरमरण आल्याची वार्ता भारतीय लष्कराकडून जंजाळ कुटुंबियांना देण्यात आली. यामुळे जंजाळ कुटुंबियांसह संपूर्ण मोरगाव भाकरे गावावर शोककळा पसरली आहे.

प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत ४ जणांना ठार केलं आहे. अन्य चार जण अजूनही परिसरात लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती.

सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या हल्ल्यात अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ यांच्यासह अन्य एक जवान शहीद झाला आहे. जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply