Akola News : अकोल्यात पनोरी- जणोरी गावाचा संपर्क तुटलाल नदीच्या पुरात पर्यायी रस्ता गेला वाहून

Akola News : सातपुडा पर्वत रांगेत पडत असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर आला आहे. नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील पनोरी व जणोरी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पर्यायी तयार करण्यात आलेला रस्ता पुरात वाहून गेला आहे. 

अकोल्याच्या  अकोट तालुक्यातील पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे वाढ झाली. त्यामुळे नदीला पुर आला आहे. त्यात पणोरी आणि जणोरी गावाच्या रस्त्यावरील पठार नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. म्हणून गावकऱ्यांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्या बांधण्यात आला आहे. पण सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर  आला आणि पर्यायी रस्ता वाहून गेला. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे. 

Shrikant Shinde : येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार; खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

मागील काही माहिन्यांपासून अकोट तालुक्यातील पठार नदीवरील नव्याने बांधकाम सुरू असलेले पुलाचे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने काम सुरु असल्याने पर्यायी उभरण्यात आला. पण आता हा पर्यायी पुल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मध्यरात्रीपासून मुख्य गावांशी संपर्क बंद आहे. काही नागरिक जीव मुठीत घेऊन पुरांच्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply