Akola News : रुग्णाच्या जेवणात निघाल्या आळ्या; अकोला शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Akola News : अकोला शासकीय सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथे चक्क रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्या. पण गरम जेवणात जिवंत अळ्या आळ्या कुठून, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक 13 मध्ये देण्यात येणाऱ्या जेवणात चक्क किडे आणि अळ्या निघाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर रुग्णांच्या ताटातील अन्नामध्ये अळ्या निघाल्यानंतर त्या रुग्णाने हा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासन सज्ज झालं आणि संपूर्ण वार्डाची पाहनी केली.

Raigad Bus Accident : सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली; दोघांचा जागीच मृत्यू, ५५ प्रवासी जखमी

यावेळी मनसेचे पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन डीनला या प्रकरणाची विचारणा केली. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर यावेळी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये म्हणतात, जेवणामध्ये आळ्या कुठून आल्या यासाठी समिती गठीत केली आहे. पण किचनमध्ये गरम अन्न शिजवलं जातं. तर त्या ठिकाणी गरम अन्नामध्ये जिवंत अळ्या कशा आल्या आणि कुठून आल्या? याची ही चौकशी करण्यात येणार आहे.

कारण बाकीच्या रुग्णांच्या ताटात कुठेही अळ्या नव्हत्या. तर या ठिकाणी कुठून आल्या? त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती चौकशी करून नेमका काय अहवाल देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पण घडलेला प्रकार हा खूप खळबळ जनक आहे. असं डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी म्हटलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply