Akola Crime News : अकोल्यात तिघांकडून २ पिस्टलसह ९ जिवंत काडतूस जप्त; टोळीप्रमुख दुबईतील कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात

Akola Crime News : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी गजाआड  केलंय. २५ वर्षीय शुभम लोणकर आणि इतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्टलसह ९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारीला देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं होतं. २७ वर्षीय अजय तुकाराम देठे आणि २५ वर्षीय प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांवर राहत्या घरून अटकेची कारवाई झाली  होती. आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Wardha News : दारूबंदी जिल्ह्यात दारू पुरवली तर बारमालकांचे परवाने होणार रद्द; २५ बारचे परवाने रद्दबाबत प्रस्ताव

असा झाला खुलासा

अजय आणि प्रफुल्ल या दोघांनी काही दिवसांपूर्वी शुभमने सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्तींकडून पार्सल घेतलं होतं. हे पार्सल देशी पिस्टलचं होतं. दोघांनाही याबाबत काहीही कल्पना नव्हती. घरी नेल्यानंतर त्यांनी पार्सल ओपन केलं अन् थेट त्यामध्ये दोन पिस्टल दिसले. तेव्हा दोघेही घाबरले. दोघांनीही शुभमला वेळोवेळी फोन करून बोलावलं, पण तो पार्सल नेण्यासाठी आला नाही.

याची सगळीकडे चर्चा झाली. ही बातमी पोलिसांपर्यत पोहचली, अन या टोळीचा खुलासा झाला. पिस्टल बोलवणारा शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. शुभम हा गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात वास्तव्यास आहे. अखेर अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातून ताब्यात घेतलंय.

इंटरनॅशनल गुन्हेगारासोबत शुभमचा संपर्क

शुभम लोणकर हा गैंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई (bishnoi gang) यांच्या संपर्कात होता, अशी माहिती मिळतेय. त्या दोघांच्या संपर्काचे अनेक व्हिडिओ कॉल, फोन रेकोर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत.

दुबईतील इंटरनॅशनल गॅंगमधील गुन्हेगारा सोबत शुभमचा चांगला संपर्क होता. त्यांचे फोन कॉल समोर आले आहेत, अशी माहिती अकोला पोलीस अधिक्षकांनी दिलीय. विशेष म्हणजे गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई हा सध्या तुरुंगात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply