Akola Breaking News : नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, 70 हून अधिक प्रेक्षक जखमी

Akola Breaking News : नमो चषकादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 70 हून अधिक लोक जखमी झाले झाल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातल्या दगडपारवा येथे ही दुर्घटना घडली आहे. जखमींना तात्काळ अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Milind Deora : काँग्रेसची साथ सोडत हाती घेतलं धनुष्यबाण; मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात नमो चषक सुरू आहे. 12 ते 14 जानेवारी दरम्यान या ठिकाणी कब्बडी आणि बॉडी बिल्डिंगचे सामने ठेवण्यात आले होते. दरम्यान आज अंतिम सामने सुरू असताना हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांसाठी बांधण्यात आलेली गॅलरी अचानक कोसळली. यात 70 हून अधिक प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमींना बार्शीटाकळी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे तर काहींना अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *