Ajit Pawar Speech : काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

Ajit Pawar  : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कोल्हापुरात उत्तरदायित्व सभेचं आयोजन केलं आहे. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अजित पवारांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

उपमुख्यमंत्रीअजित पवार म्हणाले, ‘कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. या सभेनंतर रायगडमध्ये सभा घेणार आहे. आता गणपती आणि दसरा आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे आमच्यासाठी प्रेरणा देणारं आहे’.

राष्ट्रवादीतील बंडाविषयी भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ‘अजित पवार तिकडे गेले, त्यांच्यावर दबाव होता, हो आमच्यावर लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. आम्ही पण मराठ्यांची औलाद आहे. फुसक्या दबावाला भीक घालत नाही. आता आमची बदनामी करण्याचं काम सुरू आहे’.

Thane Elevator Accident : ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू

‘ जातीय सलोखा कधीही बिघडू नये, अशा पद्धतीने काम करायचं आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने काही काम करू शकत नव्हतो. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी सरकार चालवत आहोत. आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत गेला नाही, असे ते म्हणाले . 'काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरे टोला लगावला.

मराठा आरक्षणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात प्रयत्न करत आहोत. आम्ही मनोज जरांगे यांना समजून सांगत आहोत. मात्र, मनोज जरांगे समजून घेत नाहीयेत. आता त्या मागणीवर दुसरे मोर्चे निघत आहेत. आता आम्ही वेगळ्या परिस्थितीत आहोत. या प्रश्नावर सर्वच पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे. सर्वांची मते नेमकी काय हे जाणून घेऊ’.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply