
Mumbai : दृश्यमानता प्रमाणापेक्षा खूपच कमी असल्यामुळे बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, असा प्राथमिक निष्कर्ष हवाई अपघातांचा तपास करणाऱ्या संस्थेने (एएआयबी) काढला आहे.
AAIB चा प्राथमिक अहवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला. या दुर्घटनेत पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास ‘एएआयबी’कडे सोपवण्यात आला होता. अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच शनिवारी या संस्थेने प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला. बारामती येथे धावपट्टीवरील फिकट होत चाललेल्या खुणा आणि धावपट्टीच्या पृष्ठभागावर सैल खडी याकडे बोट दाखवताना ‘एएआयबी’ने नियंत्रण नसलेल्या विमानतळांवर उड्डाणे करणाऱ्या सर्व ऑपरेटरना निर्धारित मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) जारी करावेत, अशी शिफारस केली आहे.
पायलटचे शेवटचे शब्द काय?
‘एएआयबी’ने २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे, विमानतळाकडे येताना वैमानिकांनी दृश्यमानतेविषयी विचारले होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून ३००० मीटर असल्याचे उत्तर मिळाले. लॅण्डिंगला परवानगी देताना हवा साधारण असल्याचे नियंत्रण कक्षाने म्हटले होते. मात्र, व्हीएफआर विमानासाठी दृश्यमानता प्रमाणापेक्षा कमी होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या डाव्या बाजूला विमान जमिनीवर आदळले. त्यावेळी वैमानिकांचे अखेरचे शब्द ‘ओह **... ओह **’ असे होते’.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांच्या सहकार्याने विमानातील सॉलिड स्टेट कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (एसएससीव्हीआर) डाऊनलोड केला जाईल. सॉलिड स्टेट फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील (एसएसएफडीआर) डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू असल्याचे ‘एएआयबीने’ स्पष्ट केले आहे.
‘तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर जेव्हा विमान वाहतूक सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करणे आवश्यक आहे असे वाटेल तेव्हा ते सुरक्षा शिफारशी जारी करू शकतात’, असे एएआयबीने म्हटले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
- दोन्ही वैमानिकांनी या आधीही बारामती विमानतळापर्यंत प्रवास केला होता. त्यामुळे त्यांना परिसराची, विमानतळाची माहिती होती.
- दोन्ही वैमानिकांनी याआधी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वैमानिक म्हणून भूमिका पार पाडली होती. यामध्ये इतर अनियंत्रित विमानतळांचा समावेश होता. तसेच बारामतीचाही समावेश होता.
- विमानतळावर विंडसॉकशिवाय दिशादर्शनासाठी सुविधा उपलब्ध नाही. या धावपट्टीवर दोन विंडसॉक असून दोन्ही विंडसॉक रनवे २९ च्या बाजूला आहेत. ११ च्या दिशेला एकही विंडसॉक नाही.
- बारामती विमानतळावर विमान बचाव आणि अग्निशमन यंत्रणा नाही. त्यासाठी बारामती महापालिकेकडून मदत घ्यावी लागते.
- रनवे रिकार्पेटिंग ही प्रक्रिया विमानतळ देखभालीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. ही प्रक्रिया बारामती विमानतळावर मार्च २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर ही प्रक्रिया झालेली नव्हती. त्यामुळे संपूर्ण धावपट्टीवरील खुणा या पुसट झाल्या होत्या. धावपट्टीवर खडी आढळून आली.
- विमानतळाभोवती सुरक्षा भिंत नाही. सध्याचे कुंपण अपुरे असून संपूर्ण विमानतळाभोवती नाही.
- बारामती विमानतळावर हवामानाशी संबंधित माहिती देणारी सुविधा नाही.
- विमान धावपट्टी ११ वर उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या डाव्या बाजूला नियंत्रण सुटल्याने आदळले.
- गावातील सीसीटीव्ही दृश्यांवरून हे विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उजवीकडे वळल्याचे दिसून येत नाही.
- जमिनीवर आदळण्यापूर्वी उतारावरच्या झाडांवर विमान आदळले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

