Ajit Pawar Plane Crash |अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?

28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. संबंधित विमान कंपनी बेकायदेशीररीत्या अतिरिक्त विमान इंधनाचे कॅन विमानात ठेवत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच अपघातग्रस्त विमानात अशा प्रकारचे इंधनाचे कॅन होते का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, या अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर आला असून त्यात विमान कोसळल्यानंतर काही वेळाने दोन ते तीन स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडिओनुसार, विमान दुर्घटनेनंतर घटनास्थळी काही नागरिक पोहोचले असताना आगीच्या ज्वाला उसळत होत्या. त्याच वेळी आणखी एक मोठा स्फोट झाल्याचे दृश्य दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्हिडिओमुळे अपघाताचे नेमके कारण काय?, अतिरिक्त इंधनामुळे स्फोट झाला का?, याबाबत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *