Ajit Pawar On Supriya Sule : संसदपटूंनी भाषणं करून प्रश्न सुटत नाहीत; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Ajit Pawar On Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काल (गुरूवार) विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणातील निकाल देत अजित पवार आणि शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. यानंतर आता दोन्ही गटांकडून निवडणूकांच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवारांनी आज बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळालं. आपण काम करतो फक्त सेल्फी काढत फिरत नाही, भाषण करून संसदपटू किताब मिळवल्याने कामे होत नाहीत असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

Pune News : शाळेत खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

विधानसभा अध्यक्षांनी आमदार आपात्रता प्रकरणात निकाल देताना अजित पवारांचा गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामती येथे बोलत होते.

बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, "माझं सांगणं आहे की मनात संभ्रम ठेवू नका. अजून पण काहीना वाटतंय की हे एकच होतात की काय, आपल्यालाच बनवत आहेत असं वाटतंय. आम्ही स्पष्ट सांगून पण ऐकलं जात नाहीये. बारामतीकरांनो मी तुम्हाला अजून पण सांगतो, आता ते घरातील वरिष्ठ एकमेव आहेत. दुसरे आहेत पण ते पुण्यात असतात. त्यामुळे मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचीत बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सावध केलं.

"मला एवढंच सांगायचं आहे की बाकीचे घरातील सगळे माझ्या विरोधात गेले तर हे (समोर बसलेले लोक) माझ्या बरोबर आहेत आणि त्यामुळे आपण विनंती करायची ती करू पण प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार स्वातंत्र्य आहे. पण एवढं इतरांकरीता करून, जीवाचं रान करून देखील कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय ते बघा", असे अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं.

"आपल्याला उद्याच्या काळात देशात एनडीएचं सरकार आणायचं आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपला मतदारसंघ, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे.त्याकरिता माणून किंवा व्यक्ती निवडून देऊन प्रश्न सुटत नाहीत. पार्लमेंटमध्ये नुसते भाषणं केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. पार्लमेंटमध्ये भाषणं करून मी जर आता इथं न येता मुंबईत बसून भाषणं करून, उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं कामं बघीतलीच नसती तर कामं झाली असती का?" अशा शब्दात अजित पवारांनी अनेकवेळा संसदपटू हा किताब मिळवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले की, आजही सकाळी कामाची पाहाणी करण्यासाठी मी जेव्हा जातो तेव्हा अनेक आया-बहिणी, पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात. त्यांच्या तक्रारी मी ऐकूण घेत असतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply