Ajit Pawar On Nawab Malik : त्या पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेन; फडणवीसांच्या 'लेटर'वरील प्रश्नावर अजित पवार रोखठोक बोलले

Ajit Pawar On Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करून घेणे योग्य होणार नाही, अशा आशयाचं पत्र भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उद्देशून पाठवलं आहे. या पत्राबद्दल अजित पवारांनी आज, शुक्रवारी आपली स्पष्ट भूमिका मांडली. फडणवीसांच्या पत्राला उत्तर देणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांना विचारल्यानंतर, त्या पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेन, तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही, असं रोखठोक उत्तर त्यांनी दिलं.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे काल, गुरुवारी पहिल्यांदाच विधीमंडळ अधिवेशनात आले होते. ते कामकाजात सहभागी झाले होते. मलिक सभागृहात सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं. मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

Manoj Jarange News : माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय, पण जीव गेला तरी माघार नाही; भर सभेत जरांगेंना अश्रू अनावर

अजित पवार यांच्या पत्राबद्दल आज, शुक्रवारी अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर मलिक यांच्यासदर्भातील पत्र मिळालं. ते मी वाचलं. मलिक काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते कुठे बसले, ते मीडियानं दाखवलं आहे. मलिकांचे मत ऐकल्यानंतर मी त्यावर माझं मत व्यक्त करेन, असं पवार म्हणाले.

प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे आम्ही २ जुलै रोजी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सरकारसोबत गेलो. या सर्व राजकीय घटनांनंतर मलिक पहिल्यांदाच सभागृहात आले. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे मत ऐकल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राला रिप्लाय देणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेल. सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे पवार म्हणाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply