Ajit Pawar on Maratha Reservation : 'आरक्षण दिलं तर...'; अजित पवारांचं मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य

Ajit Pawar on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. 

सोलापुरातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यानिमित्त शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अजित पवारांनी संबोधित केलं. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं. 

hMumbai Kandivali Fire News : अग्नीतांडव! मुंबईच्या कांदिवलीत इमारतीला भीषण आग, चिमुकल्यासह दोन जणांचा होरपळून मृत्यू तर तीन जखमी

अजित पवार म्हणाले, 'प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उपोषण करू शकतात. सभा घेऊ शकतात. आंदोलन करू शकतात. पृथ्वीराज चव्हाण सरकारने दिलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही'.

'राज्यात ६२ टक्के आरक्षण आहे. ५२ टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे. तर १० टक्के आर्थिक निकषांवर आरक्षण आहे. मनोज जरांगे याचं म्हणणं आहे की, 'मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या'. ओबीसीमध्ये सध्या ३५० जाती आहेत. मी मराठा समजाचा आहे, दुसऱ्या समाजाचा नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.

'आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ३५ कोटी होतो. आता १४० कोटी झालो. त्यात कोणी थांबायलाच तयार नाही. त्यात देवाची कृपा नसते. आपलीच सगळी कृपा असते. आमची मराठा आरक्षणासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. आरक्षण दिलं तर टिकलं पाहीजे. सत्ताधारी म्हणून ती आमची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

'आताच्या आरक्षणाला धक्का न लावता नवीन आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आरक्षण कोर्टात टिकलं पाहीजे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहीजे. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहीजेत, असे ते म्हणाले.

शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 'बहुजन आणि वंचित समाजाला मदत करण्याकरिता आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारानेच पुढे चाललो आहोत. त्यात कुठलीही तडजोड केलेली नाही, असे अजित पवारांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply