Ajit Pawar News : अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते? अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी एक-दीड वर्षापूर्वी मला राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते असा गोप्यस्फोट देखील अजित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन खासदारांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून पुण्यात जाहीर सभा देखील होणार आहे, याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, पण त्यातल्या एका खासदाराने पाच वर्ष आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यातला एक खासदार एक-दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता माला राजीनामा द्यायचा म्हणून... त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा.

Shambhuraj Desai : ...तर जरांगे पाटलांना दिल्लीला सोबत घेऊन जाणार...; मराठा आरक्षणावर शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य

आता त्यांचं हे सगळं चाललं आहे, पण मधल्या काळात ते सहाही मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. त्यांनी मला आणि त्यावेळचे आमचे वरिष्ठ यांना मी राजीनामा देतोय म्हणून सांगितलं होतं. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमांवर परिणाम होतो आहे. मी काढलेला एक शिवाजी महाराजांवरील सिनेमा चालला नाही. माझा प्रपंच आणि आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो आहे, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या  अजित पवार  पवार म्हणाले.

मी हे बोलणार नव्हतो पण... आता यांना उत्साह आला आहे. निवडणूका जवळ आल्याने कोणाला पदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुचतेय. चालायचं, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

त्यावेळी उमेदवारी देताना योग्य पद्धतीने दिली होतं. आम्हाला वाटलं होतं की, ते वक्ते उत्तम आहेत. उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी चांगली बजावली. ग्रामस्थांना खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं असेही अजित पवार म्हणाले. यादरम्यान आता त्यांच्या एवजी दुसरा बदली उमेदवार देणार का? असं विचारल्यानंतर, तु काळजी करू नको. आजच सांगतो, तिथं दिलेला उमदवार निवडूनच आणेन असं मिश्कील उत्तरही अजित पवारांनी यावेळी दिलं.

आक्रोश मोर्चा

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवरून आक्रोश मोर्चाला सुरूवात होणार असून तीन दिवस मोर्चा सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा मोर्चा जाणार आहे. मोर्चाची सांगता 30 डिसेंबरला पुण्यात सभेने होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply