Ajit Pawar : कोण संजय राऊत? विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले वैचारिक मतभेदाची एक झलक शुक्रवारी (ता.२१) पुन्हा एकदा पहावयास मिळाली.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्‍न विचारला असता, कोण संजय राऊत? असा सवाल पवार यांनी केला.एवढेच नव्हे तर, प्रत्येकाने आपापल्या पक्षाचे काम करावे, असा सल्लाही पवार यांनी राऊत यांचे नाव न घेता, त्यांना दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (पीडीसीसी) आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा बॅंकेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेत पवार यांना संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल केल्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्‍न विचारला असता, त्यांनी हा सवाल केला.

आठवडाभरापूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ४० आमदारांसह भाजपसोबत जात असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. या चर्चेमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केले होते.

शिवाय अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याबाबत रोखठोक या सदरातही लेख लिहिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या अजित पवार यांनी आम्ही आमच्या पक्षाबाबत निर्णय घेत आहोत. त्यामुळे अन्य कोणीही आम्हाला सल्ला देण्याची आवश्‍यकता नसल्याचे स्पष्ट करत, मी कुणाच्या बापालाही घाबरत नसल्याचे अजित पवार यांनी संजय राऊत यांना उद्देशून वक्तव्य केले होते.

पवार यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये थेट शरद पवार यांच्याशी चर्चा करत असतो. अन्य कोणाची मला चर्चा करण्याची गरज नसल्याचे सांगत, अजित पवार यांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी हा सवाल केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply