Ajit Pawar : १ रुपयात चहा मिळत नाही, पण सरकारने पीक विमा योजना आणली : अजित पवार

Ajit Pawar : '१ रुपयात आता काय मिळतं? चहा तरी मिळतो का? पण सरकारने १ रुपयात पीक विमा योजना आणली. या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला. सर्वांनी याचा फायदा घ्या, असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते पुण्यातील जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. 

पुण्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,उपसभापती नीलम गोऱ्हे,आमदार,खासदार उपस्थितीत होते.

या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, 'मी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा करिश्मा पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांचं सरकार पाहिलं आहे. गेले ९ वर्ष नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश प्रगती पथावर चालला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र विकासाची गाडी भरधाव वेगाने जाईल. महाराष्ट्र सरकारला मोठा निधी मिळत आहेत'.

Delhi AIIMS Hospital Fire : दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग, फायर ब्रिगेडच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

'आपला कुटुंबासारखा कारभार चालला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. विकास होत असताना जमीन लागते, जमीन मर्यादित आहे. समृद्धी महामार्गाला अडचण होती, योग्य मोबदला दिला तर शेतकरी जमीन देतात,या सगळ्यात कुठे तरी मागे पुढे सरकावे लागते. कोणालाही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन विकास केला जाईलस, असे अजित पवार म्हणाले.

'आज २४ हजार लाभार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. अनेक लाभार्थी महिलांना लाखो रुपये मिळाले आहेत. अनेक योजना तुमच्या माझ्यासाठी आहेत. १ रुपयात काय मिळतं? चहा तरी मिळतो का,पण सरकारने १ रुपयात पीक विमा योजना आणली. लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, सगळयांनी याचा फायदा घ्या, असेही पवार म्हणाले.

'पावसाने ओढ दिली आहेत, त्यामुळे अनेक धरणात पाणी कमी आहे. सर्वात जास्त धरण पुणे जिल्ह्यात आहेत. काही जण टीका करत आहेत. एवढं पाणी धरणात आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजून बारामतीला आलो नाही. मला उपसासिंचनाचे पैसे वाढले म्हणून फोन आले. उपसासिंचन योजनेचा अनेक ठिकाणी फायदा झाला, असे ते म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply