Ajit Pawar News: सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, त्याआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर्स; चर्चांना उधाण

Ajit Pawar : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं नेमकं काय होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे परिसरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी पुण्यात अजित पवारांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील भाकरी फिरवण्याचा निर्णय, त्यानंतर शरद पवारांच्या राजीनामा, त्यानंतर त्या पक्षात अनेक घडामोडी झाल्या. तसेच, राज्यातील मुख्य राजकीय पक्षांमध्ये देखील आरोप, प्रत्यारोप, विविध घडामोडी घडल्या.

तसेच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा न्यायालयाचा निकाल कधी येणार यावरुन सुद्धा बरीच चर्चा सुरू होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्याच येणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना पुण्यातील वांजळे चौकात भावी मुख्यमंत्री म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे मोठा फ्लेक्स लागला आहे.

या फ्लेक्सवर अजित पवार यांच्या विविध भावमुद्रा असलेली छायाचित्रे आहेत. तसेच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ आणि विकासाची गगनभरारी, हीच अजितदादांची कामगिरी असा आशय यावर लिहलेला आहे.

वारजे परिसरात २००२ पासून महापालिकेवर सतत चार पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून जात आहे. वारजे परिसरात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. तसेच पुणे शहरातून कोल्हापूर मुंबईकडे जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. त्यामुळे हा फ्लेक्स लावल्यानंतर याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply