Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला

Ajit Pawar : पिंक ई-रिक्षा वाटप करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरक्षेच्या दृष्टीतून बहिणांना मोलाचा सल्ला दिलाय. रिक्षामध्ये जर तुम्ही पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढून ठेवा, असा सल्ला अजित पवारांनी महिलांना दिला. पुण्यात आज पिंक-ई-रिक्षा वाटप करण्यात आलं. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी महिलांना महत्त्वाची सूचना दिलीय. तुम्ही जर पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा. तो फोटो तुमच्या घरी पाठवून द्यायचा की आता मी या प्रवाशाला घेऊन जात आहे

जर त्या ग्राहकांनी काय गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील. आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळ्या विचारांचे लोक असतात. काही लोक विकृत असतात, त्यामुळे हे गरजेचं असल्याचं अजित पवार म्हणाले. फोटो घेतांना पुरुषांना सांगायचं भावा तू माझ्याकडे बसला आहेस, तुझी आठवण म्हणून फोटो काढते, असं अजित पवार महिलांना सल्ला देताना म्हणाले.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, आज पिंक इ रिक्षा वाटपाचा कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम महत्वाचा असून राज्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. महिला आणि मुलींनी रिक्षाने जाताना या पिंक रिक्षाचा विचार करावा. या योजनेतून आम्ही महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम आम्ही करत आहोत. राज्यात लाडक्या बहिणी विधानसभेला आमच्या पाठीशी विश्वासाने उभ्या राहिल्या. आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला. आम्ही महिलांच्या पाठीमागे मजबुतीने उभे आहोत.

लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सरकारवर टीका करत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, अनेकजण आमच्यावर आरोप करतात की पुढील काळात आमच्या योजना बंद पडतील. लाडक्या बहिणीचा निधी देणार नाहीत, पण मी आज सगळ्यांना सांगतो, राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केलीय. महिलांच्या सन्मानासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या महिला त्याला लाभामध्ये बसतात. त्या महिलांचा निधी कधीच बंद करणार नाहीत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply