Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे फटका; अजित पवार यांचे केंद्राकडे बोट

Ajit Pawar : कांदा प्रश्नावर उत्पादक आणि ग्राहकया दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढावा, असे केंद्राला कळविले होते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने लोकसभा निवडणुकीत राज्यातील चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसला," अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. १४) दिली.

पवार यांनी आज विधानभवनात प्रशासकीय आढावा बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, “जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी कांदा प्रश्न पेटला. कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते.

Pune Airport : पुणे विमानतळाचा प्रश्न शहांच्या दरबारी; नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची बैठक

मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो. तेव्हा केंद्रिय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांनादेखील याची कल्पना दिली."

प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार

अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्यामुळे त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'मध्ये करण्यात आली आहे. त्यावर विचारले असता, “लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचे विश्लेषण करत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही," असे सांगत अजित पवार यांनी अधिक बोलणे टाळले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply