Ajit Pawar : शरद पवार खोटं बोलत आहेत, तेव्हा कुणीच नवखं, अनुभवी नव्हतं; अजित पवारांचा काकांवर गंभीर आरोप

Ajit Pawar :  शरद पवार   धादंत खोटं बोलत आहेत असा गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय. 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं असं अजित पवारांनी  म्हटलंय. 2004 मध्ये नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारलं असं पवार म्हणाले होते. अजित पवारांनी ते विधान फेटाळून लावलंय. 1991  मध्येच पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, मात्र सुधाकरराव नाईक पवारांचं ऐकत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलत होते.  

Gondia Crime : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला आठ हजारांची लाच घेताना पकडले, गाेंदियामधील तिसरी माेठी कारवाई

अजित पवार म्हणाले,  शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपण 2004 साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं त्यावेळी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आलं होतं.  माञ मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही.  2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply