Ajit Pawar : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! अर्थमंत्री पद अजित पवार गटाकडे जाणार?

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिवसेना भाजपसोबत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासह आणखी 8 नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं मात्र, त्यांना अद्याप मंत्रिमंडळात कोणतंही खातं दिलं नाही.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली आहे. या संबधीचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकावर समितीचे अध्यक्ष ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. समितीच्या इतर सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार(वने),उदय सामंत(उद्योग), अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे आहेत. तर वित्त मंत्री या समोर कोणतंही नाव लिहण्यात आलेलं नाही. 

हे खाते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असून त्या ठिकाणी नाव लिहिण्यात आलेले नाही. त्यामुळे वित्त खाते अजित पवार गटाकडे आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

तर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. तर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने विरोध केला आहे.

तर भाजपने अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिल्याच्या चर्चा दिसून येत आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. एकूण पाच सदस्यांची ही समिती आहे. या समितीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावापुढे वने मंत्री , उदय सामंत यांच्या नावापुढे उद्योग मंत्री आणि अतुल सावे यांच्या नावापुढे सहकार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा मंत्री उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही.

अर्थमंत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थखातं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतानाही फडणवीस यांचा उल्लेख त्या रिक्त जागी करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आहे का? अशा चर्चा सुरू आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply