Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांचा बारामती लोकसभेचा अर्ज नामंजूर; नेमकं कारण काय?

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती लोकसभेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी महायुतीकडून लोकसभेचा डमी अर्ज भरला होता.

मात्र, एकाच वेळी दोन अर्ज मंजूर करता येत नसल्याने अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर झाला आहे. त्यामुळे बारामतीत आता सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगणार आहे.

Pune News : धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू

बारामती लोकसभा मतदारसंघ हा महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी अजित पवारांनी डमी अर्ज भरला होता. खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, आज अर्जाची छानणी करण्यासाठी सर्व उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं. यात अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. दोन अर्ज मंजूर करता येत नाही म्हणून अजित पवार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगणार आहे. येत्या ७ मे रोजी बारामतीसाठी, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे.

त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्तीविषयी माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर स्थूल मूल्य हे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ एवढं आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्याकडे ३८ कोटी रुपये किंमतीची स्थूल मालमत्ता आहे. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची तब्बल एक अब्ज १४ कोटी एवढी प्रचंड संपत्ती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply