Ajit Pawar : 'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, त्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा', अजित पवारांचे इंदापूरमध्ये विधान

Ajit Pawar : 'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. इंदापूरच्या राधिका पॅलेसमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. या सभेमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदापूरमध्ये वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, 'काय लागेल तो निधी आम्ही द्यायला सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय तशी आमच्यासाठी मशीमध्ये कचाकचा बटणं दाबा. म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं वाटेल. नाही तर माझा हात आखडता येईल.' अजित पवाराच्या या वक्तव्यामुळे आता सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ram Navami 2024 : देशभरात रामनवमीचा उत्साह; अयोध्येत भाविकांची मांदियाळी, रामलल्लाचा सूर्य किरणांनी अभिषेक संपन्न

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, 'मला आदेश द्यायची सवय झाली आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो. पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांना नीट बोलावं लागतं.', अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर या सभेमध्ये उपस्थित असणारे सर्वजण हसू लागले.

अजित पवार यांनी असे देखील सांगितले की, 'जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25/50 वर्षांचा विचार करा. बारामतीत कामाला आदर देतात. पण भरत शहा यांनी टनदिशी उडी मारली. एवढं करून ते गेले असे काय घडले? आताच निवडणूक वेळी जायचं होतं का? मी काल त्याच्याशी बोललो होतो.'

अजित पवारांनी यावेळी विरोधकांवर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की,'मोदींची प्रशासनावर पकड आहे. उगाच उठवायचे आणि चकाट्या पिटायच्या संविधान बदलणार. काहींनी म्हणायचं ही शेवटची निवडणूक आहे, हुकूमशाही येणार असे म्हणायचे. काहीही सांगणार, काहीही आरोप करणार. आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. आधी शिवसेनेसोबत गेलो तेव्हा कोण बोलले का? आता भाजपसोबत गेले भाजपसोबत गेले असे म्हणतात. अरे ती पण माणसे आहेत ना? महायुतीत गेलो म्हणून पुढे मागे सरकावे लागत तसे त्यांनी पण सरकावे.' असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply