Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मोठी खबरदारी; अजित पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या बारमती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी मुख्य लढत असणार आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीने मोठी खबरदारी घेतली आहे. या मतदारसंघात अजित पवार यांनी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून उमेदवारीचा अर्ज घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सचिन दोडके यांनी अर्ज घेतला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबात प्रश्न उभा राहू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून अधिकचा उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Navneet Rana : मोदींची हवा, या फुग्यात कोणी राहू नये; नवनीत राणांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे, तसेच अजित पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच सचिन दोडके यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply