Ajit Pawar : महाराष्ट्रात १ नंबरचा तालुका करणार; तुमचा पाठिंबा हवा.. अजित पवारांची बारामतीकरांना साद

Ajit Pawar : बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला विकासात नंबर १ करण्याचा निर्धार व्यक्त केला.

काय म्हणाले अजित पवार?

"पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बारामतीत आले आहेत.नमो रोजगार पहिल्यांदा नागपूरमध्ये घेतला आणि तिथे मोठा प्रतिसाद मिळाला, लातूर मध्ये केला त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात केला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत आपण संधीचे सोने केले पाहिजे," असे अजित पवार म्हणाले.

Anil Deshmukh : माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील बडा नेता.. अनिल देशमुख यांचा खळबळजनक दावा

तसेच "आज अनेक विकास कामांची उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केले. आज माझी खूप इच्छा होती की तिथे प्रत्यक्षात जाऊन उद्घाटन करावं जे आज टिव्ही वर दाखवले आहे तसं आपण सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात. महाराष्टातील नंबर एकचे बसस्थानक बारामतीचे आहे. मला असंच वाटत की कुठली ही काम करायचं असेल तर ते एक नंबर करायचं," असेही अजित पवार म्हणाले.

फडणवीसांकडून अजित पवारांचे कौतुक..

"अजित दादा यांनी या मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील हा पहिला मेळावा आहे. कौशल्याप्रमाणे त्यांना रोजगार मिळेल. बारामती एस टी स्टँड एखाद्या विमानतळ सारखे झाले आहे. सरकारी इमारतीसुद्धा आता कॉर्पोरेट बिल्डिंग सारख्या झाल्या आहेत. दादा तुम्हाला विनंती आहे की इतक्या चांगल्या इमारती बारामतीमध्ये बनवल्या आहेत तर राज्यात सुद्धा अशाच इमारती बांधा," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचे कौतुक केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply