Ajit Pawar : राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप? अजित पवार गट अलर्ट मोडवर; आमदारांना दिल्या 'या' सूचना

Ajit Pawar : राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडमुकीमध्ये अजित पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता त्यांच्या गटाकडून आमदार, मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

देशातल्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्या अनुषंगाने अजित पवार गट अलर्ट मोडवर आलेला आहे. कुठल्याही फॉर्मवर सह्या न करण्याच्या सूचना त्यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत. अजित पवार गटाचे सर्व आमदार, मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या असून मंगळवारी ही बैठक संपन्न झाली.

Union Budget 2024 : PM मोदींचा मोठा खुलासा, कसं असेल यंदाचं बजेट?

13 राज्यातील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होतील.

महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश

महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, भाजपचे खासदार मुरलीधरन, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण या खासदारांचा समावेश यामध्ये आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply