Ajit Pawar : स्टॅमपेपरवर लिहून देतो, भूमिका बदलणार नाही; काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चेवर अजित पवरांनी टाकला पडदा

Ajit Pawar : आम्ही कुटूंब एकत्रित आलो की कार्यकर्त्यांना वाटतं की, हे एकच आहेत. कशाला वाईट पणा घ्यायचा असंही अनेक जण म्हणतात. पण आपण आता पुढे गेलोय. याबाबत कोठेही मॅचफिक्सिगं नाही. आता आपल्यासोबत त्यांना कोणास फसवायचे नाही, आम्ही वेगळी भूमिका घेतली आहे. आता त्यात बदल नाही, हे मी स्टॅमपेपर देखील लिहून देतो, अशा शब्दांत अजित पवारांनी काका पुतण्यांवर सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे.

२३ ऑक्टोबर रोजी विद्या प्रतिष्ठानच्या दौंड येथील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यानंतर काका पुतण्या एक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर आज राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक पार पडल्यावर उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी पडदा टाकलाय.

Wada Accident News : मातीने भरलेल्या डंपरने बाप लेकाला चिरडले; केळठण- गोराड रस्त्यावर झाला अपघात

अजित पवार आणि शरद पवार दोन्ही काक पुतणे एकाच मंचावर आल्याने याबाबत राजकिय वतुर्ळात चांगलीच चर्चा रंगली होती. या सर्व चर्चेवरच अजित पवारांनी पडदा टाकलाय. कोण कोणाला ओवळाताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होतात. मात्र तसं काही नाही. आपल्याला गद्दारी, मॅच फिक्सिंग करायाची नाही, असं अजित पवार म्हणाले.

प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो वयोमानाप्रमाणे नवी पिढी पुढे येत असते त्यांना मार्गदर्शन करावे लागते. मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.

कमळावर लढणार नाही

अजित पवार कमळावर लढणार अशाही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यावेळी त्यांनी या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. काही जण जाणीवपूर्वक सांगत आहेत की मी कमळावर लढणार आहे. मात्र असं काही नाही, असं अजित पवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply