Ajit Pawar : मविआ अ‍ॅक्शन मोडमध्ये! अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

Ajit Pawar : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची रविवारी शरद पवार यांच्या निवास्थानी बैठक पार पडली. कर्नाटक निवडणूक आणि सत्तासंघर्षवरील निकालावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली.

दरम्यान रविवारी झालेल्या मविआच्या बैठकीवर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, "२०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले कर्नाटकमध्येही कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश होता.

मात्र कर्नाटकमध्ये पराभव झाल्याने भाजपमध्ये निराशा पसरल्याचे ते म्हणाले. तर २०२४ लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपांवर बोलताना अजित पवार म्हणले की, "मागच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती.

पण आता ठाकरे गटसोबत आहे. त्यामुळे तिघांनी ४८ जागा वाटपांबद्दल चर्चा करावी, तसेच २८८ विधानसभेच्या जागा वाटपांवरही निर्णय घ्यायला हवा," असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला. तसेच जागा वाटप करताना प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांमध्ये बसून चर्चा होईल असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच जयंत पाटील यांनी आलेल्या EDच्या नोटीसीवर बोलताना,अजित पवार म्हणाले, आज जयंत पाटील यांच्या बरोबर पाच वाजता मीटिंग आहे. त्यांना आज भेटणार आहे. बातमी वाचली आहे. नक्की काय प्रकरण माहिती नाही. अशी माहिती अजित पवार  यांना यावेळी दिली. पवार यांच्या या वक्तव्यामुळं दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply