Air IndiGo : एअर इंडिगो विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; मोठी दुर्घटना टळली!

मुंबई : नागपूर ते मुंबई विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाने चक्क आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार एअर इंडिगो विमानात घडली. मात्र, वैमानिक आणि सहवैमानिक सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे हे विमान मुंबईकडे २४ जानेवारी सकाळी ११.०५ वाजता रवाना झाले हे विमान मुंबई विमानतळावर १२.३० च्या सुमारास उतरत असतानाच एका प्रवाशाने विमानाचे आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. विमान हवेत असताना असा दरवाजा उघडल्यास प्रवासी आणि विमान दुर्घटना होण्याची भीती असते.

विमानातील वैमानिक आणि सहवैमानिक यांना हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्वरित त्या प्रवाशाला वेळीच सूचना दिल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इंडिगो विमान कंपनीने दिली आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि ३३६ तसेच एअरक्राफ्ट कायदा १९३७ अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply