Mumbai : मुंबईत एअर इंडियाच्या महिला पायलटनं आयुष्य संपवलं, बॉयफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mumbai : एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या 25 वर्षीय महिला पायलट जोई तानिया चेरियन हिचा मृतदेह मुंबईच्या अंधेरी परिसरातील फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणात दिल्लीतील तिच्या बॉयफ्रेंड डेरिक जोसेफ याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोई आणि डेरिक काही काळापासून एकत्र राहत होते. मंगळवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, डेरिकने जोईला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृतदेहावर काही जखमांचे खुणा आढळल्यामुळे हा संशयाचा विषय ठरला आहे.

जोईच्या कुटुंबीयांनी डेरिकवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, डेरिक सतत जोईवर मानसिक दबाव आणत असे आणि तिच्या वैयक्तिक निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, डेरिकने जोईला मांसाहार सोडण्यासाठी तसेच एअर इंडियामधील नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती केली होती. या मानसिक त्रासामुळेच जोईने टोकाचे पाऊल उचलल्याचा त्यांचा आरोप आहे. अद्याप डेरिक याच्याकडून संबंधीत संबंधीत घटनेबद्दल कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला कॉल, महिला ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळावरून सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. डेरिकविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांमधील मेसेजेस आणि त्यांच्या परस्पर नातेसंबंधांचीही सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होते, ज्यामुळे ही घटना घडली असावी.

जोई तानिया चेरियन ही एअर इंडियामध्ये प्रशिक्षित पायलट होती आणि तिचे करिअर यशस्वीपणे सुरू होते. तिच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने नातेसंबंधातील तणाव व मानसिक ताण याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply