Ahmednagar Renamed As Ahilyanagar : अहमदनगर नव्हे, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Ahmednagar Renamed As Ahilyanagar : अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा घेण्यात आलाय. नगर शहराचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती.

Pune ISIS Module : पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात मोठी अपडेट; दहशतवाद्यांकडून सोनाराच्या दुकानात झाली होती लूटमार

या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल आणि नगरविकास विभागाकडून करण्यात येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply