Ahmednagar : बापरे! तब्बल २४ कोटींचे सोनं आणि चांदी जप्त,अहमदनगरमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई

Ahmednagar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरामध्ये जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. प्रचारमध्ये कोणतीही कसर सुटता कामा नये यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे प्रचारसभा तर दुसरीकडे राज्यात निवडणुकीपूर्वी काही ठिकाणी मोठी रक्कम जप्त केल्याच्या घटना घडल्या. आता अहमदनगरमध्ये देखील तब्बल २३ कोटींचे सोनं पोलिसांनी जप्त केल्याची घटना समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. अशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्ब्ल २३ कोटी ७१ लाख रुपयाचे सोन्याचे बिस्कीट तसेच चांदी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली गाडी ही पुण्यावरून संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांनी सुपा टोलनाक्याजवळ ही कारवाई केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या याचा तपास सुरू आहे.

Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

महत्वाचे म्हणजे हे सोनं-चांदी कोणाकडे घेऊन जात होते? कोणत्या उमेदवाराशी याचा संबंध आहे का नाही? की GST चुकवून हे सोनं नेण्यात येत होते याबाबत आता पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोग तपास करत आहे. खरंतर पैशे असो की सोने-चांदी याची आचारसंहिता काळात वाहतूक करायची असल्यास प्रशासनाकडून संबंधित मार्गांवरून प्रवास करत असल्याचा परवाना घेणे आवश्यक असते. तसेच त्याला प्रशासनाकडून विशिष्ठ प्रकारचा बारकोड देण्यात येतो. मात्र गाडी चालकाकडे पाहिजे तेवढे कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली असून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply