Ahmednagar News : संगमनेर शहरात बिबट्याचा पाच तास मुक्त संचार; शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

Ahmednagar News : संगमनेर शहरात लोकवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना आज सकाळी घडली. सुरुवातीला नाशिक रोडवरील मालपाणी लॉन्समध्ये आश्रय घेतलेल्या बिबट्या  नंतर मलादाड रोडवरील आदर्श कॉलनीकडे गेला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळीच एका बिबट्याने पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून संगमनेर शहरात प्रवेश केला. नाशिक  रोडवरील मालपाणी लॉन्सची संरक्षक भिंत ओलांडून बिबट्याने आत प्रवेश केला. मात्र लॉन्सच्या कर्मचाऱ्यांनी गदारोळ केल्याने त्याने त्याठिकाणाहून धूम ठोकली. बिबट्याचा हा मुक्त संचार लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सकाळच्या वेळी रस्त्यावर वाहतूक आणि नागरीकांची वर्दळ असल्याने गोंधळलेला बिबट्या मालदाडरोडने धावत आदर्श वसाहतीत शिरला आणि तेथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन लपला. 

Maratha Reservation : आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवलाच; मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला काय सांगितलं?

रेस्क्यू ऑपरेशन करत पकडले 

भरवस्तीत बिबट्या शिरल्याची चर्चा शहरभर पसरल्याने मालदाड रोड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच  वन विभागासह शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात यश आले. संगमनेर शहरात तब्बल पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या थरारानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यातून बिबट्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी मार्गस्थ करण्यात आले. सुदैवाने या यात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply