Ahmednagar Lok Sabha : ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Lok Sabha : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, अशा आशयाचे बॅनर्स अहमदनगरमध्ये झळकले आहेत. शहरात ठिकठिकाणी हे बॅनर्स लागलेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ही बॅनरबाजी नेमकी कुणी केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अहमदनगर  शहरात लावण्यात आलेल्या पिवळ्या रंगाच्या बॅनर्सवर मफलर परिधान केलेल्या माणसाचे चित्र आहे. याशिवाय बॅनरवर महापुरुषांचे देखील फोटो आहे. ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

 

सध्या हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनर्समुळे राजकीय नेत्यांसह लोकसभा उमेदवारांचं चांगलंच टेन्शन वाढलंय. लोकसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. अहमदनगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना रंगणार आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीने सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेत्यांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच शहरात ओबीसीलाच सरकार्य करा, अशा आशयाचे बॅनर्स लागल्याने या सामना आणखीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं होता. आता अहमदनगरमध्ये हे बॅनर्स लागल्याने निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply