Ahmednagar Lok Sabha : आमदार निलेश लंके आज मोठा निर्णय घेणार? तातडीने बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

Ahmednagar Lok Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यासाठी ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, आमदार निलेश लंके आज दुपारी आपल्या मतदारसंघात मेळावा घेणार आहेत.

सुपा येथे दुपारी १ वाजता हा मेळावा होणार असून या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर  आमदार निलेश लंके हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Sambhaji Nagar News : मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; पित्याने मावसभावासह मुलाला कारखाली चिरडलं

आमदार निलेश लंके सध्या अजित पवार गटात आहेत. मात्र, त्यांना शरद पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक  लढवायची असल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व विषयांवर ते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत.

या बैठकीनंतर आमदार निलेश लंके दुपारी पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. जर निलेश लंके यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर अहमदनगरमध्ये लंके विरुद्ध विखे असा राजकीय सामना पाहायला मिळू शकतो.

साखर सम्राट आणि पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. आतापर्यंत अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी 'काटे की टक्कर' पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत १० वेळा काँग्रेसचा खासदार झाला, तर चार वेळा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षाला प्रत्येकी एकदा संधी मिळाली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पावणे तीन लाख मतांनी पराभव केला होता. आता भाजपकडे गेलेला मतदारसंघ परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply