Ahmednagar Corona : अहमदनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन शालेय विद्यार्थ्यांना लागण

Ahmednagar Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने अहमदनगरमध्ये  शिरकाव केला असून शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेनंतर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. या दरम्यान राज्यात हळूहळू पसरत असलेल्या जेएन १ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण अनेक भागात आढळून आले आहेत.  या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना बाधित झाले असून दोन दिवसांपूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली होती. 

Mumbai-Nashik Expressway : नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

दोघांनाही सौम्य लक्षणे 

या दोन्ही विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. असे असले तरी शालेय व्यवस्थापन देखील सतर्क झाले आहे.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply