Ahmednagar Accident : मोठी बातमी! नगर- कल्याण रोडवर भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू; ३ जखमी

Ahmednagar Accident : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नगर - कल्याण रोडवर कर्जुले हद्दीमध्ये पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर-कल्याण रोडवर आज पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra Election : पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी ही बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे.

जखमींच्या मदतीला धावले मंत्री संजय बनसोडे...

दरम्यान, लातूर -उदगीर महामार्गावरच्या करडखेल पाटी इथं दूचाकीवरून जात असताना एकाचा अपघात झाला, या अपघातात बालाजी लामतुरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रक्तस्त्राव होत होता, दरम्यान रात्री उशिरा उदगीर वरुन लातूरकडे निघालेले क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची मदत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply