Ahmednagar Accident : सहलीहून परतताना मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ahmednagar  : शिर्डीजवळ विद्यार्थ्यांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बसचे पुढील टायर निखळल्याने बस बंद पडलेल्या टोल नाक्यावर चढली. बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी आणि सहा शिक्षक होते. ज्यामधील काही विद्यार्थी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधील  तापडिया कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बसला शिर्डीजवळ भीषण अपघात झाला. औरंगाबाद येथील तापडीया कोचिंग इन्स्टीट्यूटच्या वतीने ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी १२ मुले, २८ मुली आणि ६ शिक्षक असे ४६ जण एका खाजगी बसने भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी गेले होते.

परत येताना रात्री एक वाजेच्या दरम्यान राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ परिसरात बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ बसचे पुढील बाजूचे एक टायर निखळल्याने अपघात झाला. बस थेट टोल नाक्यावरील दुभाजकावर चढली. अपघात झाल्यानंतर बसचा मुख्य दरवाजा लॉक झाला आणि पुढची काच फुटल्याने विद्यार्थी घाबरून गेले होते.. स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेत शिक्षकांच्या मदतीने बचाव कार्य करत विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले..

Thane Hospital Death: ठाण्यातील रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

अपघाताची बातमी समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महेश वाघे, करण कोळगे, सिद्धार्थ घोरपडे, रमेश नरोडे, राजेंद्र घोरपडे, केतन क्षीरसागर, ऋतिक घोरपडे, सागर मोरे आदी युवकांसह पीएसआय घोडे, पो. हे. कॉ. सुरेश पवार, पो. कॉ. नरे यांनी बचावकार्य करून विद्यार्थ्यांना मदत केली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply