Assembly Election 2024: पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात! भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक; मतदारसंघही ठरला

Ahmednagar : राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अवघ्या काही तासांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असतानाच वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Pune News : भाचीला घरात एकटं बघताच मामाची नियत फिरली; पुण्याला हादरवून टाकणारी घटना

दिलीप खेडकर यांनी सांगितलं की "लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटूंबीयाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याची माहिती दिलीप खेडकर यांनी दिली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवण्यास इच्छुक असल्याचेही दिलीप खेडकर यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही तर इतर पक्षाकडूनही आपल्याला ऑफर आहे, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात आता दिलीप खेडकर हे कोणत्या पक्षाकडून विधानभेच्या रिंगणात उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply