गुजरातला विजय अनिवार्य! आज कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान; रसेल, गिलकडे लक्ष

Ahmedabad : गुजरात टायटन्स संघाला ‘प्ले-ऑफ’ मध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा कायम ठेवायच्या असल्यास त्यांना गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सोमवारी होणाऱ्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.गिलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या गेल्या सामन्यात शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका पार पाडली होती.

त्याच्याशिवाय साई सुदर्शननेही शतकी खेळी केली. ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवायचे झाल्यास या दोन्ही खेळाडूंना कोलकाताविरुद्धही चमक दाखवावी लागेल. सध्या सात संघ ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीत आहेत. सनरायजर्स हैदराबाद चौथ्या तर, चेन्नई सुपर किंग्ज (१४ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे १२ गुण झाले असून ते पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यातच दिल्ली कॅपिटल्स व लखनऊ सुपर जायंट्स संघाचे समान १२ गुण आहेत. गुजरातचे १० गुण आहेत. गुजरातची निव्वळ धावगती चांगली आहे. मात्र, गुजरातला विजय मिळवण्यासह इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागेल.

MS Dhoni : धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली, माहीच्या पाया पडला अन् मिठी मारली

नरेन, सॉल्टवर भिस्त

कोलकाता संघाचा प्रयत्न आपले अग्रस्थान आणखी भक्कम करण्याचा राहील. त्यांना सुरुवातीच्या दोन संघांमध्ये राहण्यासाठी केवळ एकच विजय आवश्यक आहे. कोलकाताने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला १८ धावांनी नमवत ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित केले होते. कोलकातासाठी सुनील नरेनने ४६१ धावा केल्या असून १५ गडी देखील बाद केले आहेत. यासह आंद्रे रसेलने २२२ धावा करण्यासोबत १५ बळी मिळवले आहेत. लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने १८ बळी मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे सलामीवीर फिल सॉल्ट नरेनसह संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करतील. यासह कर्णधार श्रेयस अय्यर व रिंकू सिंहकडूनही संघाला अपेक्षा असतील.

रशीदमोहितकडून अपेक्षा

गुजरातच्या गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या गोलंदाजांमध्ये सातत्यपणाचा अभाव आहे. तर, फिरकीपटू अधिक धावा देताना दिसत आहेत. त्यामुळे अनुभवी मोहित शर्मा व रशीद खान यांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. नूर अहमदच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहील. संदीप वॉरियर व कार्तिक त्यागी यांना संधी मिळाल्यास योगदान द्यावे लागेल. गुजरातच्या फलंदाजांना या सामन्यात चमक दाखवावी लागेल. गेला सामना सोडल्यास त्यांच्या शीर्ष फळीतील फलंदाजांना चमक दाखवता आली नव्हती. गिल व सुदर्शनने गेल्या सामन्यात पहिल्या गड्यासाठी २१० धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. मात्र, संघातील डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा आणि राहुल तेवतिया यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply