नवी दिल्ली : अदानींना मागे टाकले, मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी  हे ३ जून रोजी शेअर्समध्ये आलेल्या विक्रमी तेजीनंतर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार, मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार, अंबानी यांची एकूण संपत्ती ९९.७ अब्ज डॉलर इतकी आहे. २०२२ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत ९.६९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या स्थानी आहेत. तर गौतम अदानी हे ९८.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह नवव्या स्थानी आहेत.

एलन मस्क जगात सर्वात श्रीमंत

मनी कंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, टेस्लाचे मालक एलन मस्क हे २२७ अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यानंतर अॅमेझॉनचे जेफ बेजोस हे १४९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत. एचव्हीएमएचचे बर्नाड अरनॉल्ट १३८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे १२४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या स्थानी आहेत. प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफे हे ११४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह या यादीत पाचव्या स्थानी आहेत.

एका वर्षात रिलायन्सच्या शेअर्सने दिला २७ टक्के रिटर्न

दरम्यान, गेल्या आठवडाभरात रिलायन्सच्या शेअर्समध्ये ६.७९ टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळते. २०२२ मध्ये आतापर्यंत या शेअर्समध्ये १६.६१ टक्क्यांची वाढ नोंदवलेली आहे. गेल्या वर्षभरात या शेअर्सनी २७ टक्के रिटर्न दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply