African Swine Fever : नंदूरबारमध्ये स्वाईन फ्लू, नागरिकांमध्ये भीती; शासनाकडून डुकरांची किलिंग प्रक्रीया सुरु

African Swine Fever : नंदुरबार  जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात काही डुकरांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भितीचं वातावरण होतं. यापार्श्वभूमीवर शासनाने मृत डुकरांची तपासणी केली होती. या तपासणीत डुकरांना स्वाईन फीवर असल्याचं समोर आलं आहे. फिवरची लागन झाल्याचं समोर आलं आहे. एक किलोमीटरच्या आतील डुकरांची किलिंग प्रक्रीया शासनाने सुरु केली आहे. पशुसंवर्धन विभागाने काल 14 आणि आज 12 डुकरांना पकडून त्यांची किलिंग प्रक्रीया केली आहे. त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने पुरलं आहे.

डुकराची किलिंग प्रक्रीया

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील म्हसावद गावातल्या मृत डुकरांना अफ्रिकन स्वाईन फिवरची लागन झाल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर एक किलोमीटरच्या आतील डुकराची किलिंग प्रक्रीया शासनाने सुरु केली आहे. पशुसंवधर्न विभागाने काल 14 आणि आज 12 डुक्कारांना पकडले. त्यांची किलिंग प्रक्रीया करत त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने पुरले आहे.

CM Eknath Shinde : मुलाचं भाषण ऐकतना वडील एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांत अश्रू, म्हणाले, “श्रीकांत बोलत असताना…

गेल्या आठवड्यात म्हसावदमध्ये अचानकपणे शंभरहुन अधिक डुक्कारांचा मृत्यु झाला होता. त्यांचे नमुणे भोपाळला पाठवण्यात आले होते. त्यात डुकरांना अफ्रिकन स्वाईन फिवर ची लागन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर प्रशासन किलींग प्रक्रिया पुर्ण करुन संपुर्ण परिसरात निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. या विषाणूचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होणार नसला तरी प्रशासन संपुर्ण सतर्कता राखून आहे.

स्वाईन फिवरच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना

शहादा तालुक्यातील म्हसावद गाव आणि एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व डुकरांचे किलिंग करून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यात येणार आहे. त्यानंतर त्या परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. अफ्रिकन स्वाईन  फिवर  या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात उपाययोजना करण्यात येत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता डुकरांची किलींग प्रक्रिया सुरू झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply