Advertise Flex : पुणे शहरात बेकायदा ६४२ होर्डिंग जमीनदोस्त

पुणे - शहरात बेकायदा होर्डिंगने रस्ते, चौक गजबजलेले असताना त्यावर वर्षानुवर्ष महापालिका कारवाई करत नव्हती. महापालिकेचे बुडणारे उत्पन्न आणि शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारून नऊ महिन्यात ६४२ होर्डिंग जमीनदोस्त केले. तरीही शहरात अद्याप किमान एक हजार ३०० अनधिकृत होर्डिंगचा वापर सुरू आहे.

 व्यावसायिक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, क्लासचालक, राजकीय पुढारी यांचे कार्यक्रम व इतर उपक्रमाच्या जाहिरातींसाठी चौकांमधील, रस्त्यावर होर्डिंगला प्राधान्य देतात
- यातून होर्डिंग व्यावसयाला महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते
- असे होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्‍यक
- त्यासाठी महापालिका २०१३-१४ पासून आत्तापर्यंत प्रति वर्ष प्रति चौरस फुटाला २२२ रुपये शुल्क आकारत होती
- याता वाढ करून प्रति वर्ष प्रति चौरस फुटासाठी ५८० रुपये शुल्क निश्‍चित केले.

काय आहे स्थिती?
- शहरात अधिकृत २ हजार ३११ अधिकृत होर्डिंग
- एकिकडे अधिकृत होर्डिंगचे शुल्क वाढवत असताना बेकायदा होर्डिंगमुळे महापालिकेचे व व्यावसायिकांचेही नुकसान
- महापालिकेने सर्वेक्षणात शहरात एक हजार ९६५ बेकायदा होर्डिंग संख्या आढळली
- सर्वाधिक होर्डिंग हे नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत
- बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांना अर्ज करून होर्डिंग अधिकृत करून घ्यावे अन्यथा महापालिका कारवाई करेल असे स्पष्ट करूनही अनेकांनी प्रतिसाद दिलेला नाही
- महापालिकेने आता क्षेत्रीय कार्यालयांना अतिरिक्त मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून कारवाई सुरू केली आहे
- २०१८ ते २०२२ या कालावधीत महापालिकेने एकूण एक हजार ३४३ होर्डिंग काढून टाकले आहेत. त्यापैकी ६४२ होर्डिंग हे १ एप्रिल ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत काढले आहेत.

महापालिकेने निश्‍चीत केलेले शुल्क मान्य नसल्याने काही व्यावसायिकांनी उच्च न्यायालायात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत १११ रुपये प्रति चौरस फूट शुल्क भरावे असे आदेश न्यायालयाने दिले. पण जे व्यावसायिक न्यायालयात गेले नाहीत ते शुल्कच भरत नाहीत. त्यांची थकबाकी वाढत असल्याने थकबाकी असलेले होर्डिंग जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १९६५ अनधिकृत होर्डिंग आहेत हे निश्‍चित झाले. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना मनुष्यबळ व साहित्य देऊन पुरविले आहे. गेल्या एप्रिल ते ११ जानेवारी या कालावधीत ६४२ होर्डिंग काढून टाकले आहेत. जे होर्डिंग अधिकृत होणार नाहीत किंवा होऊ शकणार नाहीत ते काढून टाकले जाईल व त्याचा खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला जाईल.
- माधव जगताप, उपायुक्त, आकाश चिन्ह विभाग

बेकायदा होर्डिंगवर केलेली कारवाई
२०१७-१८ - २१८
२०१८-१९- २६८
२०१९-२० - ५४
२०२०-२१ -१२
२०२१-२२ - १४९
एप्रिल २०२२ - ११ जानेवारी २०२३ - ६४२



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply