Aditya Thackeray : वरळीत चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही, आदित्य ठाकरेचा भाजपवर निशाणा

Aditya Thackeray : 'वरळीत कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही.', असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. वरळीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून फुटबॉलच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी नीट परीक्षा गोंधळ, त्यांच्यासोबत वरळी मतदारसंघावरून भाजपवर निशाणा साधला.
 
वरळी मतदारसंघामध्ये इतर पक्षाची लोकं येऊ लागली आहेत. याप्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, 'मी निवडणूक लढवताना म्हणालो होतो की वरळी सीट कशी आहे बघायला सगळे येतील. वरळी ए प्लस होताना सगळीकडून लोकं येतात. मी त्यांचे स्वागत करतो. मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा अशी मी विनंती करतो. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी याठिकाणी कमळ येऊ देणार नाही.', असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
 
तसंच, 'डायरेक्टर बदलून काही होणार नाही. मंत्री बदलले पाहिजे. पहिल्यांदा मंत्र्यांनी सांगितले होते की काहीच गडबड नाही. नंतर म्हणाले काही गडबड असू शकते. नंतर परीक्षेला २४ तास शिल्लक होते तेव्हा परीक्षाच रद्द केली. लाखो विद्यार्थ्यांचे पैसे कोण देणार, नुकसान झाले त्याची भरपाई कोण देणार. वन नेशन वन पोल म्हणतात. पण एक परीक्षा नीट घेऊ शकत नाही. मला वाटते ही परीक्षा कदाचित निवडणूक आयोगच करत आहे. नीट परीक्षेबाबत जो कोणी दोषी आहे त्यावर कारवाई व्हायलाच हवी.', अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply